लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भारतीय नौदलातून निवृत्त झालेले ‘सी हॅरिअर’ हे लढाऊ विमान वांद्रे बँडस्टँड येथील वाहतूक बेटावर स्थापित करण्यात आले आहे. भारतीय नौदलाकडून हे विमान औपचारिकरीत्या मुंबईला गुरुवारी प्रदान करण्यात आले. नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले हे विमान सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ विमान नौदलाने मुंबईला भेट दिले आहे. नौदलाकडून निवृत्त झालेल्या ‘आय.एन.एस. विराट’ युद्धनौकेवर हे विमान तैनात होते. हे विमान महापालिकेने बँडस्टँड येथील वाहतूक बेटावर बसविले आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटनसौंदर्यात आणखी भर पडणार आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला दरवर्षी या परिसरात शालेय विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परिसरात नौदलाचे सामथ्र्य दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या विमानाचे औपचारिकरीत्या हस्तांतरपत्र भारतीय नौदलाचे फ्लॅग ऑफिसर ऑफ महाराष्ट्र श्रीनिवासन यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. वांद्रे येथील बँडस्टँड येथे आयोजित सभारंभाला महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया, उपायुक्त पराग मसुरकर, एच/पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.