01 October 2020

News Flash

नवी मुंबई: कुत्रीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला आज कोर्टात करणार हजर

मालकाने व्हिडीओ पाहिला तेव्हा व्हिडीओतल्या मुलाला ओळखले

नवी मुंबईमध्ये एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी खारघरमधून एका विकृताला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी म्हणजे त्याची रवानगी 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली होती. आज(दि.26) त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

काय होती घटना –
या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस आली होती. व्हिडिओ पाहून एका सजग नागरिकाने याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. खारघरमध्ये राहणाऱ्या विजय रंगारे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला. ज्यामध्ये एक तरुण कुत्रीशी लैंगिक चाळे करत होता. ही जागा त्यांना ओळखीची वाटली. त्यांनी त्यांच्या काही मित्रांना हा व्हिडीओ दाखवला. तेव्हा हा व्हिडीओ खारघरमधलाच असल्याची बाब समोर आली. सेक्टर चारमधल्या संजू दा धाबाच्या मालकाला हा व्हिडीओ त्यांनी दाखवला कारण हा त्याच जागेतला व्हिडीओ होता. मालकाने व्हिडीओ पाहिला तेव्हा व्हिडीओतला मुलगा मनमोहन असल्याचे त्यांनी ओळखले. त्याला समोर बोलावून दरडावून विचारले असता कुत्रीवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. यानंतर रंगारे आणि त्यांच्या मित्रांनी मनमोहनला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार १४ ऑगस्ट रोजी घडला होता. तर १७ तारखेला यासंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 3:26 pm

Web Title: navi mumbai a man accused of indulging in sexual acts with a dog sas 89
Next Stories
1 मेट्रो-३ मुळे मुंबईमधील रस्त्यांवरची ३५ टक्के वाहतूक कमी होईल – अश्विनी भिडे
2 “तुम्ही किती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले हे अंबानींना का विचारत नाही?”
3 कर्नाळा किल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष, बुरूज कोसळण्याच्या मार्गावर
Just Now!
X