आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी सध्या आंदोलन पुकारले आहे. शिवसेनासुद्धा विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता नवी मुंबई भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी आज मुंबईत कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तुम्ही रस्त्यावर उतरलात तर आम्हीही उतरू असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बोलत होते अशी टीका प्रशांत ठाकूर यांनी केली.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली. मनसेची राज ठाकरेंची काय भूमिका आहे हे तेच स्पष्ट करतील,” असे प्रशांत ठाकूर म्हणाले.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

या वादावर तोडगा काढण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी वारंवार दि.बा.पाटील यांच्या नावाचा आग्रह धरल्याने मुख्यमंत्री दोनदा बैठकीतून उठून गेले होते. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या २४ जून रोजी आंदोलन करण्याचा निर्णय समितीच्या नेत्यांनी केला.

बैठकीदरम्यान, सुरुवातीला मुख्यमंत्र्यानी दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास वेगळा पर्याय असेल तर सुचवा अशी सूचना केली. त्यानंतर दि. बांच्या नावाचा आग्रह समितीने धरला त्यावेळी मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले. १५ मिनिटांनी मुख्यमंत्री परतल्यानंतर त्यांनी विमानतळ सोडून कोणत्याही वास्तूला नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे या बैठकीत तोडगा न निघाल्याने समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद: “…आणि प्रशांत ठाकूर म्हणाले, विषयच संपला”

सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कालच्या बैठकीबाबत माहिती दिली. त्यावेळी तुम्ही रस्त्यावर उतरलात तर आम्हीही उतरू असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं ते मुख्यमंत्री नाही तर शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून बोलत होते असे प्रशांत ठाकूर म्हणाले. २४ तारखेला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. आता त्यावर आम्ही माघार घेणार नाही असे ठाकूर यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं – राज ठाकरे

दरम्यान, प्रशांत ठाकूर यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी विमानतळाच्या नावाबाबत भूमिका मांडली आहे. “नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटतं. हे सध्याच्या देशांतर्गंत विमानतळाचा विस्तारित भाग आहे. हा महाराष्ट्र असून मुंबई राजधानी आहे. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव असेल असं मला वाटतं,” असं राज ठाकरे म्हणाले.