नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आजपर्यंतचे एका दिवसात सर्वाधिक ११४ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पार गेली आहे. आतापर्यंत शहरात एकूण २ हजार ११० करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. शनिवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या ७० झाली आहे. शहरातील २,११० रुग्णांपैकी तब्बल १२४८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबईत करोनाचा कहर दिवासागणिक वाढत असून आज आतापर्यंतची रुग्णांची एका दिवसातील सर्वाधिक वाढ झाली असून शहरातील धोका वाढतच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शहरात आज ९० जन करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकीकडे शहरात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढत असून अद्याप ७६२ जणांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.