28 September 2020

News Flash

नणंदेचा भावजयीला दे धक्का, वैभव नाईकांची पत्नी पराभूत

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाईक कुटुंबातील नणंद भावजयीच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे वरचढ ठरल्या.

| April 23, 2015 03:39 am

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाईक कुटुंबातील नणंद भावजयीच्या लढतीत अखेर नणंद वैशाली म्हात्रे वरचढ ठरल्या. भाजपच्या तिकीटावर लढणाऱया वैभव नाईक यांच्या पत्नी वैष्णवी नाईक यांना राष्ट्रवादीकडून लढणाऱया सख्ख्या नणंदेने म्हणजेच वैशाली म्हात्रे यांनी दे धक्का दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे वैभव नाईक भाजपमध्ये आहेत. प्रभाक क्र. ५१ मधून वैभव यांच्या पत्नी वैष्णवी यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली, तर वैभव यांची सख्खी बहिण वैशाली म्हात्रे राष्ट्रवादीतर्फे याच प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर या चुरशीच्या लढतीत नणंदेने बाजी मारली असून वैष्णवी नाईक यांना पराभवाची धूळ चारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:39 am

Web Title: navi mumbai election vaishnavi naik lost against vaishali mhatre
टॅग Ncp
Next Stories
1 शिवसेनेच्या सूचना अमलात याव्यात : राठोड
2 व्हीआयपींना मुक्तद्वार, तर दारात तिष्ठते ‘आपले सरकार’
3 सावरकरांविषयीची कागदपत्रे पाहू देण्यास पोलिसांची टाळाटाळ
Just Now!
X