नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५२ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रसचे नेते गणेश नाईक यांनी शहरावरील आपले वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले. नाईक घराण्याच्या साम्राज्याला सुरूंग लावण्याच्या इराद्याने शिवसेना-भाजप महायुती याठिकाणी मैदानात उतरली होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी, नवी मुंबईकरांनी महायुतीच्या पारड्यात चांगले यश टाकले आहे. तर काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत फक्त १० जागाच जिंकता आल्या. मात्र, बहुमतासाठी लागणारा ५६ जागांचा जादुई आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही.  त्यामुळे सत्तेच्या चाव्या काँग्रेस आणि  अपक्षांच्या हाती गेल्या आहेत. बहुमताची जमवाजमव करून नाईक यांनी सत्तेत येण्याची किमया साधली, तर ते पालिकेवर २५ वर्षे सत्ता टिकवणारे राज्यातील एकमेव नेते ठरतील.
नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेने ३७ जागांवर यश मिळवले, तर भाजपला अवघ्या सहा जागांवरच विजय प्राप्त करता आला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा भाव पुन्हा एकदा वधारण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत पक्षाविरोधी बंड केलेल्या तब्बल ४० बंडखोरांची सेनेला चिंता होती. मात्र, या बंडखोरांचा कोणताही फटका महायुतीला बसला नाही. निकाल जाहीर होताना प्रत्येक टप्प्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस पहायला मिळत होती.

अंतिम पक्षीय बलाबल
शिवसेना – ३७
भाजप – ७
कॉंग्रेस – १०
राष्ट्रवादी – ५२
अपक्ष – ५
 

mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
Chief Minister Eknath Shinde interacted with MLA Jitendra Awad
मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ
maharashtra govt presents interim budget for 2024 25 with revenue deficit of rs 9734 cr
Budget 2024: संकल्पात भक्ती, तुटीची आपत्ती, लेखानुदानात देवस्थाने, स्मारकांसाठी भरीव तरतूद; आर्थिक स्थिती सावरण्याचे आव्हान
Prakash Ambedkar news
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”

* प्रभाग क्रमांक १- उज्ज्वला झंजाळ (भाजप) विजयी
* प्रभाग क्रमांक २-  शुभांगी गवते (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ३- दिपा गवते (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४- नवीन गवते (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५- जगदीश गवते (शिवसेना) विजयी

* प्रभाग क्रमांक ६-  संगीता यादव (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७- विजय चौगुले (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ८- बहादूर त्रिलोक सिंग (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ९- अपर्णा गवते (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १०- शशीकला सुतार (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ११- राजीव कांबळे (शिवसेना)  विजयी
* प्रभाग क्रमांक १२- संजू वाडे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक १३- नंदा काते (शिवसेना) विजयी

* प्रभाग क्रमांक १४- आकाश मडवी (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक १५- विजयंती भगत (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक १६- विनया मढवी (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक १७- हेमांगी सोनावणे (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक १८- एम के मडवी (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक १९- सुधाकर सोनवणे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्रमांक २०- रंजना सोनवणे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्रमांक २१- करण मडवी (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक २२- चेतन नाईक (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक २३- ममित चौगुले (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक २४- मंदाकिनी म्हात्रे (काँग्रेस) विजयी

* प्रभाग क्रमांक २५- अनिता मनवटकर (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक २६- सूर्यकांत डोळे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक २७- नामदेव पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक  २८- मोनिका पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक २९- निवृत्त जगताप (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ३०- द्वारकानाथ भोईर (शिवसेना) विजयी

* प्रभाग क्रमांक ३१- सीमा गायकवाड (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्रमांक  ३२- प्रशांत पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ३३- उषा पाटील (भाजप) विजयी
* प्रभाग क्रमांक ३४- कमल पाटील (शिवसेना) विजयी

* प्रभाग क्रमांक ३५- दिपाली सपकाळ (शिवसेना)
* प्रभाग क्रमांक ३६- सुवर्णा पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ३७- नारायण शिंदे (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्रमांक ३८- मेघाली राऊत (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ३९- अनिता पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक  ४०- शिवराम पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ४१- छाया म्हात्रे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४२- देविदास पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक  ४३- दमयंती आचरे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ४४- भारती पाटील (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ४५- संगीता म्हात्रे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४६- शंकर मोरे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४७- लता मडवी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४८- मनिषा भोईर (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ४९- रामदास पवळे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ५०- लिलाधर नाईक (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५१- वैशाली नाईक (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५२- निर्मला कचरे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ५३- प्रज्ञा भोईर (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५४- लता मडवी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५५- मुनावर पटेल (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक  ५६- उषा भोईर (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ५७- विलास भोईर (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ५८- प्रकाश मोरे (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ५९- हरिश्चंद्र भोईर (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ६०- अविनाश लाड (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ६१- किशोर पाठक (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ६२- अंजली वळूंज (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ६३- दयावती शेवाळे (भाजप) विजयी
* प्रभाग क्रमांक ६४- दया गायकवाड (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ६५- काशीबाई भगत (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ६६- रामचंद्र घरत (भाजप) विजयी
* प्रभाग क्रमांक ६७- शुभांगी पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ६८- सुरेश कुलकर्णी (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ६९- संगीता वास्के (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७०- मुद्रिका गवळी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७१- पूजा मेढकर (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७२- शशिकला पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७३- राधा कुलकर्णी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक  ७४- सोमनाथ वास्कर (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ७५- कोमल वास्कर (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ७६- संगीता बोर्डे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ७७- वैजयंती भगत (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ७८- रुपाली भागवत (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ७९- ऋचा पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ८०- कविता अंगोडे (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ८१- जयवंत सुतार (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ८२ – विशाल ससाणे (शिवसेना) विजयी

* प्रभाग क्रमांक ८३- तनुजा मडवी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ८४- रंगनाथ औटी (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ८५- सुजाता पाटील (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ८६- जयश्री ठाकूर (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ८७- सुनिता मांडवे (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक  ८८- शशिकला माळदी (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ८९- जयवंत सुतार (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक ९०- मीरा पाटील (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक  ९१- नेत्रा शिरखे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ९२- सुनिल पाटील (भाजप) विजयी

* प्रभाग क्रमांक ९३- नामदेव भगत (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक ९४- श्रद्धा गवस (अपक्ष) विजयी
* प्रभाग क्रमांक ९५- गिरीश म्हात्रे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ९६- रुपाली भगत (काँग्रेस) विजयी
* प्रभाग क्रमांक ९७- काशीनाथ पवार (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक  ९८- स्वप्ना गावडे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ९९- सलूजा सुतार (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १०० – रविंद्र इथापे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १०१- सरोज पाटील (शिवसेना) विजयी
* प्रभाग क्रमांक १०२- अशोक गुरखे (राष्ट्रवादी) विजयी

* प्रभाग क्रमांक १०३ मधून सुरेखा नगबगे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १०४ मधून राष्ट्रवादीचे जयाजी नाथ विजयी
* प्रभाग क्रमांक १०५ मधून शिवसेनेच्या भारती कोळी विजयी
* प्रभाग क्रमांक १०६ मधून काँग्रेसच्या पुनम पाटील विजयी
* प्रभाग क्रमांक १०७- दीपक पवार (भाजप) विजयी
* प्रभाग क्रमांक १०८- विशाल डोळस (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १०९- अशोक गावडे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक ११०- विनोद म्हात्रे (राष्ट्रवादी) विजयी
* प्रभाग क्रमांक १११- गणेश म्हात्रे (राष्ट्रवादी) विजयी