वाशी येथील पुलावरुन उडी मारुन आत्महत्येच्या प्रयत्न करत असलेल्या महिलेचे प्राण पोलिसांनी वाचवले आहेत. नवी मुंबईतील तीन पोलिसांनी या महिलेचे प्राण वाचवले. पोलीस इन्स्पेक्टर बागडे, पी. एन. तांबे, पी. ए. बासरे आणि वाशी वाहतूक पोलीस खात्यात काम करणारे दांडेकर यांनी या महिलेचे प्राण वाचवले. ही महिला वाशी खाडीवर असलेल्या पुलाच्या रेलिंगवर उभी राहिली होती. ती जीव देण्याच्या प्रयत्नात होती. पोलीस जेव्हा तिला काय झाले आहे हे विचारु लागले तेव्हा तिने आरडाओरडा केला. मी आता उडी मारुन माझं आयुष्य संपवणार आहे असंही या महिलेने सांगितलं. मात्र तेवढ्यात दोन पोलीस पुढे झाले त्यांनी तिचा हात पकडला आणि मग इतर पोलिसांनी समोर येऊन या महिलेला वाचवले.

पाहा व्हिडीओ

या महिलेचे नाव काय ते अद्याप समजू शकलेले नाही. तसंच तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला हेदेखील समजू शकलेले नाही. तूर्तास या महिलेला पोलीस पुलापासून लांब गेले असून या प्रकरणी पुढील तपास त्यांनी सुरु केला आहे. ही महिला पुलाच्या रेलिंगवर उभी होती. तिचा तोल थोडासा जरी सुटला असता तर ती थेट खाडीत पडली असती. ही महिला आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच तिला पोलिसांनी वाचवलं. काही वेळासाठी वाशी पुलावर वाहतूक कोंडीही झाली होती. मात्र हा महिलेला जेव्हा पोलिसांनी वाचवलं तेव्हा वाहतूक सुरळीत झाली.

कौटुंबिक कारणामुळे या महिलेने हे पाऊल उचलले असावे असे पोलिसांनी म्हटले आहे. सदर प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.