30 October 2020

News Flash

Navratri 2018 : ‘लोकसत्ता ९९९’ला जोगेश्वरीतून मंगलमय सुरुवात

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ  रूपेच. यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, सख्य, आत्मनिवेदन या नऊ भक्ती आहेत

(संग्रहित छायाचित्र)

पुढील आठ दिवस मुंबई-ठाण्यातील विविध मंडळांना भेटी

नवरात्रोत्सवाचा आनंद केवळ गरबा, दांडिया यापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीशी त्याचा मिलाफ घडवून नागरिकांना अधिकाधिक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेला बुधवारी जोगेश्वरीतून सुरुवात झाली. जोगेश्वरीतील ‘स्वस्तिक क्रीडा उत्सव’ मंडळाच्या मंडपात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवातील उरलेल्या आठ दिवसांत दादर, गिरगाव, बोरिवली, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली या भागांतील मंडळांसोबत हा सोहळा साजरा होणार आहे. अभिनेत्री ऋजुता देशमुख या कार्यक्रमांना विशेष पाहुणी म्हणून उपस्थित असेल.

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ  रूपेच. यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, वंदन, अर्चन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या नऊ भक्ती आहेत. या नऊ  दिवसांत माणसाच्या अभिव्यक्तीच्या रंगांचीही उधळण होते. नवरात्रोत्सवाचा हा अर्थ लक्षात घेऊ न ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रामबंधू’ चिवडा मसाला प्रस्तुत या स्पर्धेचे सहप्रायोजक केसरी टुर्स आणि रिजन्सी ग्रुप, पॉवर्ड बाय एम.के.घारे ज्वेलर्स आणि बँकिंग पार्टनर अपना सहकारी बँक लिमिटेड आहेत.

नवरात्रोत्सवादरम्यान लोकसत्ताची टीम मुंबई शहरात दादर, विक्रोळी, बोरिवली, डोंबिवली, ठाणे, गिरगाव, अंधेरी, जोगेश्वरी येथील एकूण आठ नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देणार आहे. या वेळी मंगळागौर, इतर पारंपरिक खेळ, तिखट पदार्थाचा फराळ यांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. जे समूह अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळागौरीचे व पारंपरिक खेळ सादर करतील आणि फराळ स्पर्धेत भाग घेतील त्या समूहाला स्पर्धेच्याच  ठिकाणी आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.

ज्या मंडळांना लोकसत्ताची टीम भेट देणार आहे, तेथील स्पर्धकांचा खेळ पाहण्याचा आनंद लुटण्याची संधी महिलांना या निमित्ताने मिळणार आहे. लोकसत्ता ९९९ नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेमुळे नवरात्रोत्सवाला आगळी रंगत चढणार आहे.

कार्यक्रम कधी, कुठे?

  • गुरुवार, ११ ऑक्टोबर – नायगाव सार्वजनिक मंडळ, १/१९ जुनी चाळ, महात्मा जोतीबा फुले रोड, नायगाव दादर (पूर्व)
  • शुक्रवार, १२ ऑक्टोबर – विक्रोळीची दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, दुर्गामाता मैदान, कन्नमवार नगर-२, विक्रोळी (पू)
  • शनिवार, १३ ऑक्टोबर – जुनी एमएचबी कॉलनी नवरात्रोत्सव मंडळ, जुनी एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प)
  • रविवार, १४ ऑक्टोबर – एकता मित्र मंडळ, एकता नगर, नांदिवली एक्स रोड, डोंबिवली (पू)
  • सोमवार, १५ ऑक्टोबर – जय अंबे मित्र मंडळ, न्यू प्रभात नगर, कल्याण ज्वेलर्सच्या समोर, शिवाजी पथ, ठाणे (प)
  • मंगळवार, १६ ऑक्टोबर – श्री जरी मरी माता उत्सव मंडळ, बोरभाट क्रॉस लेन, क्रांतिवीर राजगुरू मार्ग, गिरगाव
  • बुधवार, १७ ऑक्टोबर – नवदुर्गा मित्र मंडळ, कल्पिता एनक्लेवसमोर, सहार रोड, अंधेरी (पू)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:08 am

Web Title: navratri 2018 loksatta 999 start in jogeshwari
Next Stories
1 Navratri 2018: एसी’च्या गारव्यात गरब्याचा फेर
2 ऑनलाइन कंपन्यांना बेकायदा खाद्यपदार्थ पुरवणारे अडचणीत
3 ‘सीएसएम’टी स्थानकात जखमी प्रवासी मदतीविना
Just Now!
X