31 October 2020

News Flash

नौदलाच्या जवानाची आत्महत्या

नायडू आयएनएस तरकश या युद्धनौकेवर तैनात होता.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कफ परेड येथे बुधवारी पहाटे लोलगू नायडू (२३) या नौदल जवानाचा मृतदेह विलगीकरण केंद्राच्या आवारात आढळून आला. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

नायडू आयएनएस तरकश या युद्धनौकेवर तैनात होता. गेल्या महिन्यात या नौकेवरील जवानाला करोना संसर्ग जडल्याने इतरांना २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. नायडू कफ परेड परिसरातील केंद्रीय विद्यालयात होता. १५ ऑगस्टला करण्यात आलेल्या चाचणीत हे जवान करोनाबाधित नाहीत असे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा युद्धनौकेवर घेण्याची प्रक्रिया नौदलाने सुरू केली. हजेरी घेतली तेव्हा नायडू याचा पत्ता नव्हता. शोधाशोध केली तेव्हा त्याचा मृतदेह आढळला. कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती दिली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:57 am

Web Title: navy personnel commit suicide in cuffe parade zws 70
Next Stories
1 गणेशोत्सवातील कपडय़ांच्या बाजाराचा बेरंग
2 स्थलांतरितांसाठी आश्रय केंद्राची सोय करण्याच्या कामात अडथळा
3 नोकरी, व्यवसाय खंडित झाल्याने मासे विक्रीत नवविक्रेते
Just Now!
X