News Flash

मंत्र्यांसाठी बायोमेट्रिक जीपीएस सिस्टिम बसवा – राष्ट्रवादीची मागणी

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (संग्रहित छायाचित्र)

दोन-तीन दिवस मंत्रालयात बसा, असे मंत्र्यांनाच सांगावे लागते, याचा अर्थ राज्यातील मंत्री काम करीत नाहीत, असा होतो. त्यामुळे मंत्र्यांसाठी बायोमेट्रिक जीपीएस सिस्टिम सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केली. त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, राज्यात ५२ खाती आहेत मात्र, त्यापैकी १७ विभागात अद्याप एकही निर्णय घेण्यात आलेला नाही. मंत्र्यांना दोन-तीन दिवस तरी मंत्रालयात बसा असे सांगावे लागते, याचा अर्थ मंत्री काम करीत नाही. म्हाडा मोफत मिळालेल्या भूखंडांवर घरे बांधते. त्यामुळे १०-१५ % कमी दराने घर विकत असल्याचा सरकारचा दावा ही लोकांची दिशाभूल आहे. सरकारने म्हाडाच्या जाहिरातींना स्थगिती देऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2016 4:16 pm

Web Title: nawab malik criticized bjp shivsena govt in maharashtra
टॅग : Nawab Malik,Ncp
Next Stories
1 भुसावळमध्ये बसमधील संशयितावर गोळीबार
2 बालाघाटच्या सीताफळ हंगामावर संक्रांत
3 चंद्रपूरमध्ये चार वर्षांत २५ वाघ, ३० बिबटय़ांचा मृत्यू
Just Now!
X