02 March 2021

News Flash

डान्सबार बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलं ‘डील’ -नवाब मलिक

बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शायना एनसी यांनी मध्यस्थी केली असाही आरोप मलिक यांनी केला आहे

डान्सबार बंदी उठव्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डील केलं असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शायना एनसी यांनी मध्यस्थी केली असाही आरोप मलिक यांनी केला आहे. बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डील झाल्यानेच सुप्रीम कोर्टात सरकारने बाजू भक्कमपणे मांडली नाही. आघाडी सरकार आलं तर राज्यात पुन्हा डान्सबार बंदी लागू करू असेही मलिक यांनी म्हटलं आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू योग्य पद्धतीने मांडली नाही म्हणूनच डान्सबार सुरु होण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

याच पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी डोंबिवली शस्त्र प्रकरणावरूनही भाजपावर निशाणा साधला. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आरोपीची पाठराखण करत आहेत. पोलिसांनी चव्हाण यांच्यामुळेच धनंजय कुलकर्णींचा रिमांड मागितला नाही असाही आरोप मलिक यांनी केला. डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा विदेशी बनावटीचा आहे. हा साठा भाजपाने आणला असून ही तस्करी आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे असेही मलिक यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये अशाच हत्यारांचा वापर झाल्याचीही टीका त्यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 6:34 pm

Web Title: nawab malik serious allegation on cm devendra fadnavis on dance bar issue
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे: अजित पवार
2 शहीद झालो तरी हा लढा सोडणार नाही: छगन भुजबळ
3 डान्सबार बंद झाले पाहिजे: रावसाहेब दानवे
Just Now!
X