राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई कोर्टाने झटका दिला असून त्यांचा जावई समीर खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. नवाब मलिक यांचा जावई समीर खानला अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) १३ जानेवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणार गांजा सापडला होता. वांद्रे येथून एका कुरियरकडून तब्बल २०० किलो गांजा सापडला होता. या प्रकरणात पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालासह इतरही काही जणांना अटक केली असून बॉलिवुड जगतामध्ये ड्रग्जचा वावर किती आतपर्यंत आहे, याचे खुलासे यांच्या जबाबातून समोर येत आहेत.

 

समीर खान याच्यावर एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गैरकृत्यांना आर्थिक पुरवठा केल्याच्या गुन्ह्याचा यात समावेश आहे. या प्रकरणात एनसीबीने आत्तापर्यंत राहिला आणि शाहिस्ता फर्निचरवाला, मुच्छड पानवालाचा मालक राजकुमार तिवारी, सजनानी यांना अटक केली आहे.