05 August 2020

News Flash

नवाब मलिकांच्या नगरसेवक भावाने मराठी माणसालाच केली मारहाण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल

कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक बंधू कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कप्तान मलिक चक्क एका मराठी मुलाला मारहाण आणि आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

शेफाली वैद्य नामक एका युजरने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना टॅग करीत नवाब मलिक यांचे भाऊ मराठी माणसाला मारहाण आणि शिवीगाळ करीत असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करीत राज्यकर्त्यांनी ही मुजोरी पहावी असंही म्हटलं आहे. तसेच कप्तान मलिक यांच्यावर कारवाई न करणाऱ्या शिवसेनेला खडे बोल सुनावत शिवसेनेचा वाघ आता पवारांच्या ताटाखालची मांजर झालाय असंही वैद्य यांनी म्हटलं आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये कप्तान मलिक फोनवर बोलणाऱ्या मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करीत आहेत. यामध्ये फोनवरचा माणून मराठीतून कोणाशी तरी बोलताना नगरसेवक कप्तान मलिक आम्हाला कामाची वर्कऑर्डर मागत आहेत. तसेच त्यांनी आम्हाला मारहाण केली असल्याची तक्रार करताना दिसत आहे. संबंधीत तरुणाचं फोनवरचं हे संभाषण सुरु असतानाच कप्तान मलिक त्याला मारल्याबद्दल पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेंट कर असे उद्धटपणे बोलताना त्याचबरोबर शिवीगाळही करताना दिसत आहेत. तसेच पुन्हा इथे दिसल्यास हातपाय तोडून टाकेन अशी धमकीही देताना या व्हिडिओत दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 9:43 pm

Web Title: nawab maliks brother kaptan malik beats a marathi man another video goes viral aau 85
Next Stories
1 छत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही – चंद्रकांत पाटील
2 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आजही कराचीतच; एजाझ लकडावालाची माहिती
3 ‘लंडन आय’च्या धर्तीवर साकारणार ‘मुंबई आय’; अजित पवारांची घोषणा
Just Now!
X