07 March 2021

News Flash

साहित्यिक-वाचकांच्या मेळय़ात आज नयनतारा सहगल यांचे स्वागत

शिवाजी मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता ‘चला एकत्र येऊ’

नयनतारा सहगल

शिवाजी मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता ‘चला एकत्र येऊ’

साहित्यिका नयनतारा सहगल यांना ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यक्षेत्रात उसळलेला क्षोभ अजूनही धुमसत आहे. या संतापाला मोकळी वाट करून देण्यासाठी सहगल यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दादरच्या शिवाजी मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता हा मेळावा होईल. नयनतारा सहगल यांना ९२ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण ऐनवेळी रद्द केले. या घटनेचा निषेध अनेक पातळ्यांवर व्यक्त झाला. अनेकांनी संमेलनावरही बहिष्कार टाकला. या लज्जास्पद घटनेबद्दल सहगल यांची माफी मागून मराठी जगतात त्यांचे स्वागत करावे, या उद्देशाने मराठी लेखक, कलावंत, वाचक आणि रसिक वाचकांनी ‘चला एकत्र येऊ  या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात सहगल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील साहित्य आणि कलाप्रेमी मराठी भाषकांचा हा उत्स्फूर्त मेळावा आहे, असे आयोजकांनी सांगितले.

मेळाव्यातील मान्यवर

नयनतारा सहगल यांच्या बरोबर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, प्रा.पुष्पा भावे, डॉ. गणेश देवी, हरीश्चंद्र थोरात, अरुण खोपकर, सुनील शानभाग, नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, राजीव नाईक, येशू पाटील, टी. एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, लेखिका प्रज्ञा दया पवार, नाटय़लेखक जयंत पवार, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, संध्या नरे-पवार, समीना दलवाई, अनंत भावे, अमोल पालेकर, अतुल पेठे, इंद्रजीत खांबे,किशोर कदम,  डॉ. विवेक कोरडे, गणेश विसपुते, कवी संजीव खांडेकर, सुबोध मोरे, आशुतोष शिर्के आणि अविनाश कदम, इत्यादी  लेखक, कवी, कलावंत, विचारवंत या मेळाव्यात सहभागी होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:28 am

Web Title: nayantara sahgal in mumbai
Next Stories
1 मुतारीत नाक मुठीत!
2 मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून जंतुसंसर्ग
3 समाज, कुटुंबाचीही जबाबदारी
Just Now!
X