28 September 2020

News Flash

भाजपा सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न – शरद पवार

विद्यमान सरकारला पुन्हा सत्ता देणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले.

संग्रहीत छायाचित्र

“समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा सरकारकडून करण्यात येत आहेत. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणं चुकीचं आहे. यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. अल्पसंख्याक सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

“अल्पसंख्याक समाजाची समस्या आहे. त्या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचं असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहेत. परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे,” असा आरोपही शरद पवार यांनी केला. “पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही हिस्सा आहे. ज्यामध्ये भारतातील काही लोक रहात आहेत त्यांना आपल्या देशात परत येण्याची इच्छा आहे. त्यांचा तो अधिकार आहे परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नाही,” असंही ते म्हणाले.

“अल्पसंख्याक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचं आहे,” असेही शरद पवार म्हणाले. NRC, CAA यामुळे मुस्लिम समाजाला दुर्लक्षित केलं जात आहे. तर दुसरीकडे भटक्या विमुक्त जाती-जमातीचे जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जागेवर राहत नाही. अशा लोकांच्या नोंदी मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावं लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे ही वेळ या भाजपाने आणली आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आणखी वाचा – अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम करु : जयंत पाटील

“काही लोकांचा जन्म श्रीलंकेमध्ये झाला आहे. त्यांनाही भारतात यायचं आहे. परंतु आजच्या सरकारने जो कायदा केला आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला नाही,” असेही त्यांनी नमूद केले. “अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार नवाब मलिक यांच्यावर या खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 2:09 pm

Web Title: ncp chief sharad pawar criticize bjp government over various issues jud 87
Next Stories
1 अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा – सचिन सावंत
2 अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम करु : जयंत पाटील
3 मनसे भाजपा समविचारी पक्ष; गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत ?
Just Now!
X