भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी होते. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आदरांजली अर्पण करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. आंबडेकर यांना अभिवादन करत एक ट्विट केले. सांविधानिक मूल्ये व आत्मभान देणारे प्रज्ञासूर्य असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत शरद पवार यांनी त्यांना अभिवादन केले. दादारच्या चैत्यभूमीवर जाऊन पवार यांनी त्यांना अभिवादन केले. त्यानंतर, सांविधानिक मूल्ये व आत्मभान देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी, दादर येथे जाऊन आज महापरिनिर्वाण दिनी विनम्रपणे अभिवादन केल्याची ट्विटद्वारे माहिती दिली.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार हे सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. यानंतर लोकराज्य मासिकाचं प्रकाशन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. करोनामुळे राज्य सरकारनं चैत्यभूमीवर गर्दी करण्याचं टाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला भीम अनुयायांनी प्रतिसाद दिला.