News Flash

२५ लाखांची खंडणी मागणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक फरार

ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील नगरसेवक हारून खान यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या रकमेतील ५० हजारांचा

| January 11, 2013 05:04 am

ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील नगरसेवक हारून खान यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या रकमेतील ५० हजारांचा हप्ता घेताना खान यांचा कार्यकर्ता हमीद चौधरी याला गुरुवारी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. स्वत: हारून खान मात्र फरारी झाले आहेत.
हारून खान हे विक्रोळीच्या प्रभाग क्रमांक ११८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. फिर्यादी ठेकेदार अनिलकुमार सिंग हे रस्ते दुरुस्तीसाठी लागणारी यंत्रसामग्री पुरवितात. त्यांना नुकतेच गोदरेज कंपनीला यंत्रसामग्री पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. गोदरेज कंपनी आपल्या मतदारसंघात येत असल्याने मला २५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी हारून खान यांनी सिंग यांच्याकडे केली होती. गेले काही दिवस त्यांनी या पैशांच्या मागणीसाठी तगादा लावला होता. अखेर सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी या रमकेचा ५० हजारांचा हप्ता घेण्यासाठी हारून खान यांचा सहाय्यक आणि कार्यकर्ता हमीद चौधरी गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. हारून खान यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 5:04 am

Web Title: ncp corporator ran away who makes blackmail of 25 lakhs
टॅग : Corporator,Ncp
Next Stories
1 तांत्रिक बिघाडामुळे मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत
2 दरवाढ रोखण्यासाठी मुंबईतील खासदारांचे साकडे
3 ट्रान्सफार्मर अपहारप्रकरणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
Just Now!
X