नवी मुंबईतील नेरुळ परिसरातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नगरसेविका मागील दहा दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ता नगरसेविका शशिकला मालदी यांचा मृतदेह शुक्रवारी सापडल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे.  २३ सप्टेंबर रोजी मानखुर्दच्या रेल्वे रुळावर सापडलेला  मृतदेह शशिकला मालदी यांचा असल्याचे समोर आले असून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

२३ सप्टेंबर पासून शशिकला मालदी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी नेरुळ पोलीस ठाण्यात २८ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.  मानसिक तणावाखाली शशिकला मालदी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.  मालदी यांनी आरक्षित  प्रभागातून निवडून आल्या होत्या मात्र त्याची उमेदवारी वर विरोधकांनी शंका उपस्थित करून त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रांची मागणी केली होती. तसेच  नेरुळ मधील गणेशोत्सव मंडळामध्ये त्याचा वाद झाला होता. मालदी यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी मालदी यांची आत्महत्या आहे का हत्या याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.