News Flash

राष्ट्रवादीचे सोमवारपासून सरकारविरुद्ध हल्लाबोल आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात डिसेंबर २०१७ पासून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

पश्चिम महाराष्ट्राचा गड सावरण्याचा प्रयत्न

राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या विरोधात सोमवारपासून (२ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा हल्लाबोल आंदोलन सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर या पाच जिल्ह्य़ांत हे आंदोलन होणार असून, त्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्य़ातून होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून मागील विधानसभा निवडणुकीत काहीसा डळमळलेला हा गड सावरण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत २ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची समारोप होणार आहे, मात्र त्याचे ठिकाण व तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात डिसेंबर २०१७ पासून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भ, दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:09 am

Web Title: ncp halla bol rallies against maharashtra government to begin from monday
Next Stories
1 अ‍ॅट्रॉसिटीबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार
2 रेडीरेकनर दरांत यंदा वाढ नाही
3 उद्योजक बाळासाहेब पवार यांची गोळी झाडून आत्महत्या
Just Now!
X