News Flash

राष्ट्रवादीचे अनधिकृत कार्यालय जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने कौसा येथे करण्यात आलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अनधिकृत पक्ष कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

| March 14, 2013 05:42 am

ठाणे महापालिकेच्या वतीने कौसा येथे करण्यात आलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अनधिकृत पक्ष कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. बुधवारी दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या वतीने महापालिकाक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अनधिकृत पक्ष कार्यालयांवर कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या कारवाईत महापालिकेने कौसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनधिकृत पक्षकार्यालयावर हातोडा फिरवला. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त प्रकाश बोरसे, परिमंडळ १चे दीपक चव्हाण, मुंब्रा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त मंगल शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोण्डे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:42 am

Web Title: ncp illigal office destroyed
टॅग : Ncp
Next Stories
1 भारनियमन मुक्ती व वीज परिस्थितीत सुधारणा झाल्याचा परिणाम
2 महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित टेहळणी यंत्रणा
3 कल्याण-कर्जत जलद गाडी सुरू होणार
Just Now!
X