News Flash

खूशखबर! म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणा

मुंबईमधील घरांची उद्या लॉटरी

संग्रहित

आपल्या हक्काचं घऱ विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. लवकरच  ठाणे, कल्याण परिसरात ७५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथे तर कल्याणमध्ये शिरडोने कोणी येथील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मार्चमध्ये लॉटरीची प्रक्रिया आणि सोडत मे महिन्यात जाहीर होऊ शकते.

विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. ज्या पोलिसांना घर हवं आहे त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मुंबईची लॉटरी उद्या जाहीर होणाऱ
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची मुंबईची लॉटरी गुरुवारी जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईमधील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जाहीर होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

कोळीवाड्यात एसआरए नाही
“कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली असून जरी ही बैठी घरं असली तरी तिथे एसआरए योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना एफएसआय देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 6:07 pm

Web Title: ncp jitendra awhad mhada lottery sgy 87
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये पॉर्न फिल्मसची मागणी वाढली म्हणून…पॉर्न रॅकेट प्रकरणात धक्कादायक खुलासा
2 राज्यात पाच लाखांहून अधिक जणांचे करोना लसीकरण
3 ‘लहान मुलांना चांगला-वाईट स्पर्श कळतो’
Just Now!
X