News Flash

काही वर्षांपूर्वी ज्याचा सत्कार केला, त्याने शतकी खेळी केल्याचा आनंद – अजित पवार

अजित पवार यांनी ट्विटरवर पृथ्वी शॉचा काही वर्षांपूर्वी सत्कार करतानाचा फोटो शेअर केला आहे

मुंबईकर युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला भारताच्या वरिष्ठ संघातून पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले. जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजकीय वर्तुळातूनही पृथ्वी शॉचं कौतूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून पृथ्वी शॉचं अभिनंदन केलं असून त्याच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे.

अजित पवार यांनी ट्विटरवर पृथ्वी शॉचा काही वर्षांपूर्वी सत्कार करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘काही वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेटमधल्या कामगिरीसाठी ज्या मुलाचा सत्कार केला, त्याने क्रिकेट विश्वात भारताचं प्रतिनिधित्व करताना कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शानदार शतकी खेळी खेळली, याचा आनंद वाटतो. आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचं नाव उज्ज्वल करेल, यात शंका नाही’.

पृथ्वी शॉने विंडीजविरोधातील आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत १५४ चेंडूत १९ चौकारांच्या मदतीने १३४ धावा केल्या. या शतकासहित त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकले. पण महत्वाचे म्हणजे याआधी देशांतर्गत स्पर्धांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दुलीप आणि रणजी करंडक स्पर्धेतही त्याने पदार्पणातच्या सामन्यात शतक झळकावले होते. दुलिप, रणजी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा पृथ्वी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

प्रत्येक पदार्पणात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ ठरला पहिला खेळाडू

एक शतकी खेळी आणि ९ विक्रमांची नोंद, राजकोटमध्ये पृथ्वी शॉ चमकला

…आणि पृथ्वीने मोडला २२ वर्षांपूर्वीचा हा विक्रम

जगभरातून त्याचे कौतुक होत असताना प्रयोगशील आणि रचनात्मक सोशल मीडिया पोस्टसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबई पोलिसांनीही पृथ्वीच्या शतकाला अनोखा सलाम केला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या खास चिरपरिचित अंदाजात १८ वर्षीय पृथ्वीचे पर्दापणीय शतकासाठी अभिनंदन केले आहे. ‘१०० नेहमी मदत करते, #डायल १००’, असे मुंबई पोलिसांनी पृथ्वीच्या शतकी खेळीवर म्हटले आहे.

दरम्यान, पृथ्वीने आपले पहिले शतक वडिलांना समर्पित केले आहे. तो म्हणाला, हा माझ्यासाठी फक्त एक सामना होता. पुढच्या वेळीही माझा हाच विचार असेल. सामना सुरु होण्यापूर्वी मी निराश होतो. पण जसजसा मी खेळत गेलो तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. मी शतक झळकावले तेव्हा पहिल्यांदा मला माझ्या बाबांची आठवण आली. माझ्या या यशामध्ये वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कठोर मेहनतीमुळे आज मी भारतीय संघाकडून खेळत आहे. त्यामुळे माझे पहिले शतक वडिलांना समर्पित करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2018 6:58 pm

Web Title: ncp leader ajit pawar congratulates prithvi shaw for debut century
Next Stories
1 शिवसेनेची परिस्थिती ‘एक हात मे दो लड्डू’ : सुप्रिया सुळे
2 दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
3 व्हॉट्सअॅपवर तरुणीने केली तक्रार, ठाणे पोलीस आयुक्तांची तात्काळ कारवाई
Just Now!
X