News Flash

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार भाजपात प्रवेश करणार

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार नाराज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत असे समजते आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झाल्याने भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती पवार या शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीने ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी न दिल्याने भारती पवार नाराज झाल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक आहेत असेही समजते आहे. सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासह आता उत्तर महाराष्ट्रातील पवार घराण्याच्या सुनबाई म्हणजेच भारती पवार या आता भाजपात प्रवेश करणार आहेत.

भारती पवार या २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या धनराज महालेंना उमेदवारी दिली. त्यामुळे आता भाजपाकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने भारती पवार या भाजपात जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 3:25 pm

Web Title: ncp leader bharti pawar will join bjp
Next Stories
1 मुंबई पोलिसांची तत्परता, 48 तासांत मिळवून दिला रिक्षात विसरलेला लॅपटॉप
2 भाजपा आणि शिवसेना रंगबदलू, राष्ट्रवादीचा निशाणा
3 गोरेगावात भरधाव स्कूल बसची बॅरिकेटला धडक; क्लिनर ठार, दोन विद्यार्थी जखमी
Just Now!
X