राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत असे समजते आहे. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झाल्याने भारती पवार यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारती पवार या शुक्रवारी भाजपात प्रवेश करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीने ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी न दिल्याने भारती पवार नाराज झाल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक आहेत असेही समजते आहे. सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासह आता उत्तर महाराष्ट्रातील पवार घराण्याच्या सुनबाई म्हणजेच भारती पवार या आता भाजपात प्रवेश करणार आहेत.

भारती पवार या २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या धनराज महालेंना उमेदवारी दिली. त्यामुळे आता भाजपाकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने भारती पवार या भाजपात जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader bharti pawar will join bjp
First published on: 21-03-2019 at 15:25 IST