News Flash

“राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा”

धनंजय मुंडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी

संग्रहित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसंच यावेळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीसदेखील याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसंच संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला असून, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी,” असे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील याप्रकरणी पोलीस तत्परतेने तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

“मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी” असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

आरोपींना अटक करा – फडणवीस

“भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:53 pm

Web Title: ncp leader dhananjay munde demands to arrest people mumbai rajgruha dr babasaheb ambedkar house jud 87
Next Stories
1 Coronavirus: मुंबईत ९८४ जणांची प्रकृती गंभीर, कॉल सेंटरला दीड लाखांपेक्षा जास्त फोन
2 राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही : मुख्यमंत्री
3 धारावीने करुन दाखवलं; एकेकाळी हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीत आता…
Just Now!
X