27 September 2020

News Flash

धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार, राजेश टोपे यांची माहिती

धनंजय मुंडे फायटर असून लवकरच बरे होतील, राजेश टोपे यांनी व्यक्त केला विश्वास

संग्रहित

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं असून तयारी पूर्ण झाली आहे. ते फायटर आहेत लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होती असा विश्वास आहे,” असं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं.

आणखी वाचा- धनंजय मुंडेंच्या संपर्कातील व्यक्तींना २८ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला

“धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पण अजित पवारांच्या शिस्तीप्रमाणे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतो. मंत्रिमंडळाची लोक सुरक्षेच्या अंतरावर होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रमही पाच मिनिटांचा होता. कोणतंही भाषण देण्यात आलं नाही. ध्वजारोहण करतानाही फक्त पाच लोक उपस्थित होते. कोणालाही करोनाची लक्षणं जाणवलेली नाहीत. आयसीएमआरच्या गाइडलाइनप्रमाणे लक्षणं नसतील तर चाचणी करण्याचा विषय येऊ शकत नाही,” असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 2:46 pm

Web Title: ncp leader dhananjay munde tests corona postive admitted in breach candy hospital sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईत खासगी प्रयोगशाळेवर करोना चाचण्या करण्यास बंदी, महापालिकेचा आदेश
2 महिला प्रवाशांची कुचंबणा
3 करोनाबाधितांच्या संपर्कातील नऊ लाख व्यक्तींचा शोध
Just Now!
X