27 January 2021

News Flash

जितेंद्र आव्हाडांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मी माझ्या वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारली. राज हे अभ्यासू आहेत. अनेक विषयांची माहिती झाली.

राष्ट्रवादी नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, ही भेट राजकीय नसून वैयक्तिक कारणांसाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, ही भेट राजकीय नसून वैयक्तिक कारणांसाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांना दिली. आव्हाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मी माझ्या वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यांच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारली. राज हे अभ्यासू आहेत. त्यांच्याबरोबर बोलताना अनेक विषयांची माहिती झाली. भेटीमागे कोणताच राजकीय हेतू नव्हता. भविष्यात महाराष्ट्रासमोर असलेल्या अडचणी, नुकताच झालेल्या नाट्यसंमेलनातील भाषणाबाबत चांगली चर्चा झाली. त्यामुळे भेटीमागचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 2:18 pm

Web Title: ncp leader jitendra awhad meets mns chief raj thackeray
Next Stories
1 मुंबई : उड्डाणपुलाला श्रीदेवीचं नाव देण्याची भाजपा नगरसेवकाची मागणी
2 कौतुकास्पद ! शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च गणेशोत्सव मंडळ उचलणार
3 एसटीच्या ११४८ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, तडकाफडकी केले निलंबित
Just Now!
X