राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे आज भगवदगीतेतील एक श्लोक म्हणताना अडखळले. ‘यदा यदा शी धर्मस्य’ असा उल्लेख त्यांनी केला. त्यांची जीभ घसरल्यावर पत्रकारांनी त्यांना श्लोक म्हणून दाखवा असे म्हटले. ज्यावर जितेंद्र आव्हाड चांगलेच पत्रकारांवर भडकले. तुम्ही इथे भाजापचे प्रवक्ते म्हणून आलात का? असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाड यांनी खासगीत संपूर्ण गीता म्हणून दाखवण्याचे आव्हानही स्वीकारले. मात्र त्यांच्या आक्रमक वक्तव्याची आणि त्यांच्या चुकलेल्या श्लोकाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच रंगली आहे.

मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आला. त्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भगवदगीता वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच दिलं आहे.

Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

या सगळ्या वादात जितेंद्र आव्हाडांचा चुकलेला श्लोक आणि त्यानंतर त्यांनी खासगीत गीता म्हणून दाखवण्याचे दिलेले आव्हान यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवतगीता वाटली जाणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे. भगवद गीतेच्या वाटपावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पण नंतर कोणत्या विषयावरून प्रश्न विचारला हेदेखील आव्हाड विसरून गेले.

पाहा व्हिडिओ