28 October 2020

News Flash

अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचे काम करु : जयंत पाटील

अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवणं आपली जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले.

“राज्यात अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपलं आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे,” असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

“अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवणं आपली जबाबदारी आहे. अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी शरद पवार यांनी विश्वासाने नवाब मलिक यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे आता अधिक प्रभावी काम अल्पसंख्याक सेलचे झाले पाहिजे. शिबीरे घेतली पाहिजेत,” असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांनी सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक खाती आपल्या पक्षाकडे घेतली आहे असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुस्लिम युवक आहेत. त्यांना शिक्षणासाठी फी देण्याची जबाबदारी नवाब मलिक यांनी आपल्या खात्यातून घ्यावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली.

या बैठकीत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही आपले विचार मांडले. यावेळी शब्बीर विद्रोही, माजिद मेमन, गफार मलिक यांनी आपले विचार मांडले. या बैठकीच्यावेळी आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:51 pm

Web Title: ncp leader minister jayant patil speaks about minority problems jud 87
Next Stories
1 मनसे भाजपा समविचारी पक्ष; गिरीश महाजनांकडून युतीचे संकेत ?
2 संजय नार्वेकरांनी राज ठाकरेंचा ‘जाणता राजा’ म्हणून केला उल्लेख
3 झेंड्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचं खणखणीत उत्तर
Just Now!
X