मोदींनी देश हित मोठे की व्यापारहित मोठे हे जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. सौदी अरेबियाचे राजकुमार शेख सलमान भारतात आल्यावर मोदींनी गळाभेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले असून या गळाभेटवर नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना थेट आव्हान दिले आहे.

नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या राजकुमारांना मिठी मारून भेट घेत आहेत आणि दुसरीकडे तेच राजकुमार पाकिस्तानला २०० बिलियनची मदत करत आहेत. भारतात आल्यावर पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा साधा उल्लेखही करत नाही. भारताविषयी त्यांना प्रेम आहे की पाकिस्तानविषयी त्यांची प्राथमिकता काय आहे हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

मोदी प्रोटोकॉल मोडून त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातात अशी कोणती मजबुरी नरेंद्र मोदी यांची आहे. अरबोंच्या साहाय्याने नाणारची रिफायनरी लावली जात आहे की, धारावीचा प्रोजेक्ट त्यांना दिला जात आहे. यामध्ये अनेक लोक पार्टनर आहेत का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

आपल्या भूमीवर येवून पुलवामा घटनेबाबत निंदा करत नाही याबाबत विचारणा करायला हवी होती. सौदीचे राजकुमार २०० बिलियनची मदत करुन भारतात येतात आणि मोदी त्यांना मिठी मारून भेट घेतात हे देशहिताच्या दृष्टीने नक्कीच चांगले नाही असेही नवाब मलिक म्हणाले.