26 September 2020

News Flash

२० दिवसात ट्रान्स जेंडर बोर्ड स्थापन होणार

एकल महिलांचा विषयही या बैठकीत पार पडला

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तृतीयपंथीय समाजाच्या प्रश्नांबाबतही एक विशेष बैठक बोलावली होती. ज्यात तृतीय पंथीय समाजाचे शिष्टमंडळही हजर होते. मागील अनेक वर्षांपासून तृतीय पंथीय समाजाच्या असंख्य मागण्या प्रलंबित आहेत. तृतीय पंथीय समाजाच्या बोर्डाची मागणी त्यात प्रामुख्याने होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीने बोर्डाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी २० दिवसात तृतीय पंथीय बोर्ड स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

राज्यातील विविध समस्या आणि नवीन उपक्रमांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत बैठका घेतल्या. स्टार्की हिअरिंग फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून ८ तासात ४ हजार ८४६ कर्णबधिरांना श्रवणयंत्रे बसविण्याचा विक्रमी उपक्रम केला गेला होता. एका दिवसात सुमारे ६ हजार गरजूंना श्रवणयंत्रे वाटप केले गेले होते. याच श्रवणयंत्राचे वाटप राज्य पातळीवर व्हावे अशी कल्पना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत मांडली.

या बैठकीत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही शासनाच्यावतीने देण्यात आली. शिवाय राज्यातील एकल महिलांचा मुद्दाही खासदार सुळे यांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी येत्या अर्थसंकल्पात एकल महिलांनाही भरीव मदत केली जाईल असे आश्वासन दिले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 6:35 pm

Web Title: ncp leader supriya sule met deputy chief minister ajit pawar and state minister dhananjay munde today and demanded constitution of a welfare board for transgenders scj 81
Next Stories
1 छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात रंगला खुर्चीचा वाद?
2 #JNUProtest: आझाद मैदानात पोलिसांनी तपासली विद्यार्थ्यांची ओळखपत्रे
3 शिवसेनेला काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम हवंय का?; किरीट सोमय्यांचा सवाल
Just Now!
X