22 September 2020

News Flash

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे प्रकरण सध्या सरकारच्या पातळीवर प्रलंबित असतानाच दुष्काळ व अन्य प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या या

| December 1, 2014 03:44 am

अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे प्रकरण सध्या सरकारच्या पातळीवर प्रलंबित असतानाच दुष्काळ व अन्य प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकारला पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादीने प्रथमच मुख्यमंत्र्यांशी औपचारिक पातळीवर चर्चा केली. कापूस, ऊस, सोयाबीन, द्राक्षे, सोयाबीन, साखर या उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. शेतकऱ्यांना मदत करावी व  पॅकेज देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:44 am

Web Title: ncp leaders meet cm fadnavis
Next Stories
1 दहा वर्षांनंतर झोपु प्राधिकरणाची बैठक
2 मंत्रालयातील ‘लालफिती’ला गतिमानतेचा डोस
3 महामुंबईला आता जलप्रदूषणाचा वेढा
Just Now!
X