21 October 2019

News Flash

राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरूद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोराई येथे ढोबळे यांचे

| September 13, 2014 10:31 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरूद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोराई येथे ढोबळे यांचे महाविद्यालय असून, पिडीत महिला या महाविद्यालयात कारकून म्हणून काम करत होती. या महिलेची आक्षेहार्प छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देऊन ढोबळे यांनी आपल्यावर तीनवेळा बलात्कार केल्याचे संबंधित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ढोबळे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेसुद्धा या महिलेने सांगितले आहे. पोलिसांनी ढोबळेंविरोधात कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूरमधील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
दरम्यान लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तक्रारदार महिलेने आपल्या शैक्षणिक संस्थेतील ८० लाख रुपयांची फेरफार केली आहे. त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सूडबुद्धीने ही बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा दावा ढोबळे यांनी केला आहे.

First Published on September 13, 2014 10:31 am

Web Title: ncp mla laxmanrao dhobale accused of rape
टॅग Mla,Ncp,Rape