25 January 2021

News Flash

ना बडेजाव, ना तामझाम…युवा आमदाराचा लोकल प्रवास, तुम्ही ओळखलंत का??

अंधेरी ते मीरा रोड दरम्यान केला प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई लोकलमधून प्रवास करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईत कामानिमीत्ताने आलेल्या रोहित पवार यांनी अंधेरी ते मीरा रोड पर्यंत लोकलने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी मुंबईत असताना अनेकदा लोकलने प्रवास व्हायचा, असं म्हणत रोहित पवार जुन्या आठवणींमध्ये रमले. करोनाच्या संकटावर मात करत मुंबईची लाईफलाईन पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार म्हणून निवड झाल्यानंतर रोहित पवार हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणं, पक्षाची बाजू मांडणं, कोणताही बडेजाव किंवा तामझाम न करता रोहित पवार यांनी केलेल्या लोकल प्रवासामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 8:52 pm

Web Title: ncp mla rohit pawar share his local train journey experience on social media psd 91
Next Stories
1 …तर चर्चा नक्कीच शक्य!; फडणवीसांच्या विधानावर मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य
2 लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचा PSI वर आरोप, मुंबईतील तरुणीनं नोंदवला FIR
3 लालबागमध्ये सिलिंडर स्फोट
Just Now!
X