06 July 2020

News Flash

राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ हवी!

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दोघेही निवृत्त होत असल्याने या दोघांना पुन्हा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीच

विधान परिषद निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांची आज बैठक

विधान परिषदेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने मदत करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली असली तरी या बदल्यात काय देणार, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी बैठक होणार आहे.

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत वसंत डावखरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. ठाण्यात काँग्रेसची ताकद मर्यादित असल्याने तसेच डावखरे यांचे काँग्रेस नेत्यांशी असलेले उत्तम संबंध लक्षात घेता काँग्रेस मदत करण्यास तयार आहे. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यायच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विरोधकांचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दोघेही निवृत्त होत असल्याने या दोघांना पुन्हा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीच राष्ट्रवादीने भाजपच्या मदतीने तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर केला होता. यामुळेच काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

विधान परिषदेत राष्ट्रवादी व काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. तीन जागांसाठी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधान परिषदेचे उपसभापतिपद मिळावे, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी मात्र याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही, असे समजते. या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:27 am

Web Title: ncp need support of congress in maharashtra legislative council election
टॅग Congress,Ncp
Next Stories
1 राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच भाजपची खेळी
2 नगराध्यक्ष निवड थेट जनतेकडून!
3 ‘नीट’ अभ्यास करणार कसा?
Just Now!
X