News Flash

आपला पाळणा कधी हलणार ?, राष्ट्रवादीची भाजपाविरोधात पोस्टरबाजी

"ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?"

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मोहिते- पाटील घराण्यातील युवा नेते रणजितसिंह मोहिते- पाटील तसेच सुजय विखे- पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात बॅनर लावले आहेत. या बॅनरद्वारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना भाजपात स्थान देण्यावरुन टीका करण्यात आली आहे. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले, आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, अशी टीका या बॅनरद्वारे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच आयाराम- गयारामांचे पर्वही सुरु झाले आहे. सुरुवात राधाकृष्ण विखे- पाटील यांचे पूत्र सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशाने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर अशा मोहिते – पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. रणजितसिंह मोहिते- पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला होता.

महाराष्ट्रासह देशभरात विविध पक्षांमधील नेते भाजपात प्रवेश करत असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भाजपाविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोस्टर लावले आहेत. “ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले,गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार?”, अशी बोचरी टीका या  बॅनरद्वारे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 10:02 am

Web Title: ncp poster in mumbai after sujay vikhe ranjit singh mohite patil joins bjp
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मणरेषा ओलांडून मराठा आरक्षण
2 कर्करोगाशी लढत असलेल्या व्यक्तींसाठी “ट्री ऑफ होप” कार्यक्रम संपन्न
3 मुख्यमंत्र्यांनी गट-तट बाजूला ठेऊन सर्वांची काम केली – रणजितसिंह मोहिते-पाटील
Just Now!
X