पोलिसांच्या चौकशीचे विधान परिषदेत पडसाद
आमदारांच्या नाव-गावापासून त्यांचे संघाशी संबंध आहेत का, तसेच त्यांना गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे का, अशी आमदारांची कुंडली गोळा करण्याची पोलिसांची योजना भलतीच वादात सापडली आहे. प्रकाश बिनसाळे यांनी आज ही बाब विधान परिषदेत सभागृहाच्या निदर्शनास आणताच सर्वपक्षीय सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर या प्रकरणाची चौकशी करण्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.
विधान परिषदेत प्रश्नोतरानंतर औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे प्रकाश बिनसाळे ही बाब सभागृहात मांडताना, पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी काल आपल्या स्वीय साहाय्यकाची भेट घेऊन त्याच्याकडून विविध प्रकारची माहिती घेतल्याचे सांगितले. त्यामध्ये आमदार म्हणून माझे नाव, पत्ता, कौटुंबिक माहिती, जात, धर्म, धंदा, कोणत्या राजकीय पक्षात आहे, कोणत्या आंदोलनात भाग घेतला, किती गुन्हे दाखल आहेत इथपासून ते संघाशी संबंध आहेत का, समाजातील वजन काय, असे प्रश्न या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वीय साहाय्यकास विचारल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्तकेल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.

The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम