News Flash

भाजपा आणि पंतप्रधान मोदींमुळे संविधानाला धोका निर्माण झालाय: शरद पवार

भाजपाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत असूया आहे. ते घटनेवर विश्वास असल्याचे बोलतात. पण ती विधाने धादांत असत्यावर आधारलेली आहेत

Sharad Pawar: मूळ संघटना आरएसएस असलेल्या भाजपाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत एक प्रकारची असूया आहे. ते घटनेवर विश्वास असल्याचे बोलतात. पण ती विधाने धादांत असत्यावर आधारलेली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

गेली चार वर्षे सतत समाजातल्या उपेक्षित माणसावर, घटकांवर, तरुणांवर, अल्पसंख्याकांवर, भगिनींवर, दलित, आदिवासींवर कुठले ना कुठले अत्याचार होत आहेत. अशी शेकडो उदाहरणे सातत्याने देशात घडत आहेत. या संविधानाची चिंता राज्यकर्त्यांना वाटत नाही कारण त्यांचा संविधानावर विश्वासच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केली. मूळ संघटना आरएसएस असलेल्या भाजपाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाबाबत एक प्रकारची असूया आहे. ते घटनेवर विश्वास असल्याचे बोलतात. पण ती विधाने धादांत असत्यावर आधारलेली आहेत, असा आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला दिलेल्या मूलभूत अधिकारावर कुणी संधान साधण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाओ, देश बचाओ कार्यक्रमात ते बोलत हेाते. ते म्हणाले, गोध्रा प्रकरण जगभरात गाजले. तिथे जे झाले त्याचा निषेध मी करतो. काही मूठभर लोकांनी तिथे कायदा हातात घेतला. त्यावर कडक शासन करण्याची भूमिका घेण्याचे सोडून सबंध गुजरात पेटवण्याचे काम करुन निष्पाप लोकांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आली. हे सगळे घडतंय, घडत होते तेव्हा नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचे नेतृत्व होते. आज त्यांच्याकडेच देशाची सत्ता आहे. आज या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर परिवर्तनाचा विचार करावा लागेल.

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो हा समज मागे पडला आहे. शेती, उद्योग, नागरिकीकरण, निवाऱ्याच्या संबंधीचे प्रश्न आहेत. ज्या सगळ्यात सर्वांत जास्त किंमत घरातील महिलेला द्यावी लागते. त्यामुळे या संदर्भातील निर्णय महिलांना डोळ्यासमोर ठेवूनच घेतले जायला हवेत. मात्र आजच्या कार्यकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. चिंता ही आहे की, ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिले. त्या घटनेसंबंधी राज्यकर्त्यांच्या मनात किती आस्था आहे, याची खात्री देता येत नाही.

ही लढाई सोपी नाही पण राष्ट्रवादी शेवटपर्यंत लढणार

या संघटनेच्या प्रमुखांनी कायम सामान्य माणसाला दिलेल्या अधिकाऱ्यांच्या संबंधीची एक आशंका समाजाच्या मनात निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांचा घटनेवर विश्वासच नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यांचे मार्गदर्शक गोळवलकर गुरुजी यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात घटनेच्या विरोधात विचार मांडले आहेत. या गोळवलकर गुरुजींचे विचार मोंदीसकट सर्व मार्गदर्शक तत्व म्हणून स्वीकारतात व त्याच मार्गाने जातात. यावरून त्यांची घटनेच्या संबंधीची मानसिकता स्पष्ट होते. जेव्हा घटनेवर आघात होईल तेव्हा तो समाजातील दलित, वंचित, उपेक्षित, गरीब, अल्पसंख्याक, आदिवासी आणि विशेषतः महिलावर्गावर तो आघात असेल. हा आघात करू पाहणारा पक्ष सत्ताधारी बनून आपल्यासमोर उभा ठाकला असता यांना कसं दूर करायचे याचा विचार आपल्याला करावा लागेल. ही लढाई सोपी नाही पण लढाई केल्याशिवाय गत्यंतर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लढाई शेवटपर्यंत लढणार आणि सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणार, हा माझा विश्वास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 12:00 pm

Web Title: ncp president sharad pawar slams on bjp and pm narendra modi on constitution in mumbai
टॅग : Bjp,Sharad Pawar
Next Stories
1 अग्नितांडव! मालाडमध्ये कंपनीत तर मुंब्रा येथे गोदामात आग
2 आयेशा टाकियाच्या पतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा
3 पावसाळी अधिवेशनात सरकारच्या कोंडीची विरोधकांची व्यूहरचना
Just Now!
X