राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून २१ दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.

शरद पवारांना झालेलं Gallbladder चं दुखणं काय आहे? जाणून घ्या…

याआधी ३० मार्चला पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. १२ एप्रिलला पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुन्हा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.

शरद पवारांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; परिचारिकेचे आभार मानत म्हणाले….

नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर पुढील प्रक्रियेसाठी ते दाखल झाले. प्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे”.

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर राजेश टोपेंनी दिली होती ही माहिती –
“त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे,” अशी माहिती तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

निवासस्थानी घेतला होता करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस – 
पहिल्या सर्जरीनंतर ७ एप्रिलला शरद पवार यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी विश्रांती घेत असताना त्यांनी हा डोस घेतला होता. यावेळी सुप्रिया सुळे, डॉक्टर लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत करोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली होती.