News Flash

राष्ट्रवादीचे आमदार-खासदार सीएम केअर फंडला एका महिन्याचं वेतन देणार! शरद पवारांनी केली होती सूचना!

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार आणि खासदार एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.

शुक्रवारी सकाळीच काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्षभराचं वेतन करोनाविरोधातल्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ काँग्रेसचे सर्व आमदार एका महिन्याचं वेतन देणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्याच स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार आणि खासदार आपला एका महिन्याचा पगार मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १ कोटी रुपयांची स्वतंत्र मदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: नोट लिहून यासंदर्भात पक्षाला सूचना केली होती.

 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक चिठ्ठी लिहून पक्षाला त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. “आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन करोना संदर्भात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी, राज्यातील आरोग्य सेवा, पोलीस दल, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पक्षामार्फत द्यावे. तसेच, आपल्या पक्षामार्फत एक कोटी रुपये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात यावेत. श्री टकले व्यवस्था करतील”, अशी नोट शरद पवार यांनी दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाकडून १ कोटी रुपयांच्या निधीचा चेक देण्यात आला असून त्यासोबतच आमदार-खासदार आपलं महिन्याभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील”, असं परिपत्रक देखील पक्षाकडून काढण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:41 pm

Web Title: ncp sharad pawar note mla mp to donate one month salary for cm care relief fund corona pmw 88
Next Stories
1 पाच वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या पत्नीच्या इच्छेखातर पतीकडून नागरिकांना मोफत ऑक्सिजन पुरवठा!
2 १७६ एकल स्तंभांवर सागर किनारा पूल
3 आजचे भागले, उद्याचे काय?
Just Now!
X