05 April 2020

News Flash

पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाचे आमदार १०५ वरुन १५ होतील – नवाब मलिक

मोर्चासाठी भाजपा कार्यकर्ते कुठून आणणार असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाजपा २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मोर्चा काढणार आहे. पण त्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.

सत्ता गेल्यामुळे भाजपाकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे असे नवाब मलिक म्हणाले.

पुन्हा निवडणूका घ्या अशी मागणी भाजपवाले करत आहेत, पुन्हा निवडणूका होऊं द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल असे नवाब मलिक म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 9:54 am

Web Title: ncp spokeperson nawab malik slam bjp dmp 82
Next Stories
1 Video: चालतं फिरतं शिवस्मारक! टॅक्सीवाल्याची शिवरायांना अनोखी आदरांजली
2 Video: माटुंग्याच्या ‘त्या’ विकृताला नांदगावकरांनी चोपले; व्हिडिओ व्हायरल
3 सुरक्षारक्षकाचा खून करून पसार झालेला अटकेत
Just Now!
X