24 September 2020

News Flash

ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरकारविरोधात मुंडन आंदोलन

पुण्यातही ढोल बडवून दर्शवला राज्य सरकारचा निषेध

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी मुंडन आंदोलन केले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी मुंडन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

कर्जमाफी, आमदारांचे निलंबन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलवादन या घटनांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे. मंगळवारी ठाण्यातही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुंडन आंदोलन केले. सरकारच्या विरोधात याप्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक कार्यकर्त्यांनी सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिंडदान करताना थांबवण्याचा प्रयत्नही केला. यावरुन काही काळ तणावपूर्ण स्थिती होती. कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याने आव्हाड आक्रमक झाले. आंदोलनाला परवानगी असल्याचे आव्हाड यांनी पोलिसांना सांगितले. यावरुन पोलीस आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.

पुण्यातही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने ढोल बडवून विनोद तावडेंचा निषेध दर्शवला. तावडेंचे छायाचित्र असलेले ढोल बडवून तसेच त्यांची प्रतिकात्मक अंत्ययांत्रा काढून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रायगडावर १००० ढोल वाजवून सरकारने राज्याचा अवमान केला अशी टीका आंदोलनात उपस्थित असलेल्या नेत्यांनी केली.

ncp-pune-protest

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2017 4:34 pm

Web Title: ncp student wing protest in thane and pune against vinod tawde and bjp government
Next Stories
1 युतीचे ‘व्हेंटिलेटर’वरील संबंध ‘कासव’गतीने सुधारताहेत- उद्धव ठाकरे
2 ४३०० गृहसंस्था अडचणीत
3 टर्मिनस परळला, प्रवाशांचा ओघ मात्र शीवकडे
Just Now!
X