26 September 2020

News Flash

आरे वृक्षतोडीचं व्यंगचित्र रेखाटत राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारवर निशाणा

मेट्रो कारशेडसाठी आरे परिसरात वृक्षतोड करण्यात आली

फोटो सौजन्य : राष्ट्रवादी काँग्रेस ट्विटर हँडल

मेट्रो कारशेडसाठी आरे परिसरात वृक्षतोड करण्यात आली. या कारवाईचा सगळ्याच स्तरातून निषेध होतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्र रेखाटून सरकारने दिलेल्या आदेशाचा निषेध करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आरे परिसरात वृक्षतोड करण्यात आली. त्याचा सगळ्यांनीच निषेध केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक मार्मिक व्यंगचित्र रेखाटलं आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलं आहे.

काय आहे व्यंगचित्रात?
आरे परिसरातले तोडलेले वृक्ष या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत. वृक्ष तोडीतून जे झाडांचे बुंधे, झाडांचे कापलेले भाग आणि त्याची तयार झालेली मेट्रो आरे मधून जाताना दाखवण्यात आली आहे. आSSरेS मेट्रो… असं या मेट्रोच्या व्यंगचित्राच्यावर लिहिण्यात आलं आहे.

मेट्रो कारशेडसाठी आरे परिसरात वृक्षतोड करण्यात आली. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या सगळ्यांनीच केला. ही कारवाई प्रशासनाने अंधारात का केली? हा प्रश्न विचारला गेला. तसेच सरकारच्या या कारवाईचा निषेधही नोंदवण्यात आला. मुंबईकरांनी, पर्यावरण प्रेमींनी आंदोलनही केलं. 29 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. आता यावर कालपासून प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक व्यंगचित्र काढून या सगळ्या कारवाईचा निषेध नोंदवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 9:39 pm

Web Title: ncp tweets cartoon against aarey and metro scj 81
Next Stories
1 सत्ता आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच : आदित्य ठाकरे
2 जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
3 #AareyForest : आरे आंदोलन प्रकरणी 29 जणांना अटक
Just Now!
X