राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केल्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी सकाळपासून विविध भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
– मुंबईतील विविध ठिकाणांहून एकूण २०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
– नाशिकमध्ये किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन
– नाशिकमध्ये मुंबई नाक्यावर भुजबळ समर्थकांची निदर्शने
– दादर, वरळी भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात
– भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये कडकडीत बंद
– ओझर येथे रस्तारोको करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
– नाशिक शहर, येवला, नांदगांव, मनमाड, तसेच मुंबई-आगरा महामार्गावर रास्ता रोको