22 September 2020

News Flash

म्हाडात यंदा अत्यल्प उत्पन्न गटाची लॉटरी, हजारपैकी ८०० घरं राखीव

म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या लॉटरीतील निम्मी, म्हणजे ५०० घरे अल्प उत्पन्न गटासाठी तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी २८३ घरं राखून ठेवण्यात आली आहेत.

सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणा-या म्हाडाने नागरिकांना खुशखबर दिली आहे. ज्या लॉटरीची मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतात, त्या म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी यंदा एक हजार एक घरांचा समावेश असेल हे जाहीर करण्यात आलं आहे.

म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या लॉटरीतील निम्मी, म्हणजे ५०० घरे अल्प उत्पन्न गटासाठी तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी २८३ घरं राखून ठेवण्यात आली आहेत. लॉटरीत सर्वाधिक मागणी अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी असते पण गेल्या वर्षी या गटासाठी लॉटरीत एकही घर उपलब्ध नव्हते. त्यावरुन म्हाडाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. म्हाडाची लॉटरी नेमकी कधी जाहीर होणार, याबाबत अजूनही निर्णय झाला नसला, तरी मागच्या वर्षी झालेली लॉटरीमधील चूक सुधारण्याचा प्रयत्न यंदा म्हाडाकडून केला जात आहे. म्हाडाच्या मागच्या वर्षीच्या लॉटरीत एकूण ८१९ घरांचा समावेश करण्यात आला होता. या वर्षी ही संख्या वाढवून १००१ करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही फेसबुकवर म्हाडाची लॉटरी लाइव्ह करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कुठे किती घरं –

अल्प उत्पन्न गटासाठी घरे – एकूण घरे -५००
पीएमजीपी मानखुर्द – ११४ , मुलुंड गव्हाणपाडा- २६९ ,सायन प्रतीक्षानगर- ८४ ,गोरेगाव सिद्धार्थनगर- २४ ,घाटकोपर पंतनगर-२, विक्रोळी टागोरनगर- ७

अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे – एकूण- २८३
वडाळा अँटॉप हिल- २७८, म्हाडा इमारत घरदुरुस्ती मंडळ- ५

मध्यम उत्पन्न गट – एकूण २१६ घरे
कांदिवली महावीर नगर- १७२ , विक्रोळी कन्नमवार नगर- २८, मानखुर्द- पीएमजीपी १६
उच्च उत्पन्न गटासाठी घाटकोपरच्या पंतनगर येथे दोन घरं राखीव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 8:45 am

Web Title: nearly 800 of 1001 houses reserved for poor this year in mhada lottery
Next Stories
1 पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; १८ मजुरांचा मृत्यू, १३ जखमी
2 आत्मसमर्पण केलेले ६० नक्षलवादी एसटीत वाहक
3 सदाभाऊ म्हणतात, मी तर भाजपाचा क्रियाशील सदस्य
Just Now!
X