संरक्षणमंत्री पíरकर यांचे स्पष्टीकरण
सियाचेनमधील हिमवादळात १० जवानांचे प्राण गमावल्यानंतर सियाचेनवरून माघार घेण्याची चर्चा देशभरात सुरू झाली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत प्रतिवर्षी प्राण गमावणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय सियाचेनच्या एका बाजूस चीन तर दुसऱ्या बाजूस पाकिस्तान आहे. याच शिखरावरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण दोन्ही ठेवणे शक्य आहे. आपण शिखरावरून माघार घेतल्यानंतर कुणी त्या ठिकाणाचा ताबा घेतला तर त्यांना तिथून हुसकावून लावणे ही कर्मकठीण बाब असेल. त्यामुळे एकूणच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता सियाचेनवरून माघार घेणे अशक्यच आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांनी शुक्रवारी येथे केले.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नासकॉमच्या वार्षकि अधिवेशनातील भाषणानंतर संरक्षणमंत्री पत्रकारांशी बोलत होते. सियाचेनच्या हिमशिखरावर आतापर्यंत गेल्या ३३ वर्षांत ८७४ जवानांचे प्राण गमवावे लागले. मात्र यातील बहुतांश जवान हे १९८४ साली सियाचेनवर पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षांमध्ये शहीद झाले आहेत. पूर्वी येथे विविध अपघातांमध्ये बळी जाणाऱ्या जवानांची संख्या अधिक होती. हिमदरीमध्ये कोसळून किंवा हिमकडा कोसळून झालेल्या अपघातांमध्ये अनेक जवानांना प्राण गमवावे लागले आहेत, याची आपल्याला कल्पना आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मृत्युमुखी पडणाऱ्या जवानांची संख्या १० पर्यंत कमी करण्यात आपल्याला यश आले आहे. सियाचेन आपल्याकडे राखण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते आहे, याची कल्पना आहे. मात्र सर्वच परिस्थितींमध्ये देशसुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेलाच सर्वाधिक प्राधान्य आहे.
हनुमंतप्पा कोप्पड या जवानाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हिमवादळाप्रसंगी ते स्लििपग बॅगमध्ये असल्यानेच सहा दिवसांनंतरही शरीरात धुगधुगी राखणे त्यांना शक्य झाले होते. सियाचेनमध्ये उणे ४० अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान असते तर वारादेखील २० हजार फूट उंचीवरून प्रचंड वेगात वाहत असतो. अशा अतिविषम वातावरणात ड्रोन्सच नव्हे तर इतर अनेक उपकरणेही काम करीत नाहीत, असेही पíरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.