27 May 2020

News Flash

बिग बींच्या मराठी चित्रपटात नीना कुळकर्णी यांची सरप्राइज एण्ट्री

नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला.

नीना कुळकर्णी, विक्रम गोखले

‘नीना कुळकर्णी ’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या. अभिनेत्री या नात्याने ते प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचल्या जरुर पण आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील त्यांनी एक सरप्राइज प्रेक्षकांना दिले आहे.

नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राइज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत हे सर्वांना माहित आहे, पण नीना कुळकर्णी पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत हे अनेकांसाठी नक्कीच सरप्राइज असेल. पण त्या कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्रीच्या मागे नेमके कारण काय? याची उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहेत.

अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी निर्मित आणि गोल्डन रेशो फिल्म्स, केव्हीआर प्रॉडक्शन्स आणि क्रिष्णा प्रसाद प्रस्तुत ‘AB आणि CD’ चे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता या सिनेमाची झलक पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 1:31 pm

Web Title: neena kulkarni surprise entry in ab and cd marathi movie of amitabh bachchan ssv 92
Next Stories
1 प्रेक्षकांना धडकी भरवणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; श्याम रामसे यांचे निधन
2 मुंबईत बलात्काराच्या आरोपाखाली मनसे कार्यकर्त्याला अटक
3 मुंबईतील जन्मदरात गतवर्षी अल्पशी घट
Just Now!
X