News Flash

करोनायोद्धे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष

पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच  सेवा न देता फक्त दवाखान्यातच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झाले तरी काळजी घेण्यात शिथिलता नको. (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : करोनाविरुद्धच्या लढाईत  आघाडीवर असलेल्या राज्यातील पशुवैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना विमा कवच पुरविण्यात आलेले नाही, की त्यांना लसीकरण, औषधोपचारात प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच  सेवा न देता फक्त दवाखान्यातच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे, सरचिटणीस डॉ. संतोष वाकचौरे व कार्यकारी अध्यक्ष डॉ. शशिकांत मांडेकर यांनी राज्य सरकारच्या विरोधात असंतोष प्रकट करणारे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. केंद्र,राज्य सरकारच्या अधिसूचनांमध्ये करोनाविरुद्धच्या लढाईत पशुवैद्यकीय सेवा ही अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर केली आहे. आतापर्यंत ७०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली व ३० जणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र राज्य सरकारचे या विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:06 am

Web Title: neglect of coronation veterinary staff akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अक्षय्य तृतीयेला वाहन खरेदीस उतरती कळा
2 मुख्यमंत्री ठाकरे मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीला
3 बेरोजगारांकडून शहरात अवैध मद्यविक्रीचे जाळे
Just Now!
X