08 July 2020

News Flash

झोपमोड झाल्याने शेजाऱ्याने केली बहीण-भावाची हत्या

पती-पत्नीमधील जोरदार भांडणामुळे झोपमोड झालेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीच्या भावावरही हल्ला केल्याची घटना मुंब्रा परिसरात घडली आहे.

| November 20, 2012 04:45 am

पती-पत्नीमधील जोरदार भांडणामुळे झोपमोड झालेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीच्या भावावरही हल्ला केल्याची घटना मुंब्रा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे भांडण मिटविण्यासाठी आलेल्या स्वत:च्या पत्नी आणि नातवंडांवरही या व्यक्तीने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. आरोपीस पोलिसांनी अवघ्या तीन तासांतच अटक केली असून त्याचे नाव अजीम शेख (३०) असे आहे.
मुंब्रा भागातील मोहम्मद कुरेशी आणि झाकिरा कुरेशी या पती-पत्नीमध्ये सोमवारी सायंकाळी जोरदार भांडण झाले. या भांडणामुळे शेजारी राहणाऱ्या अजीमची झोपमोड झाली. त्यामुळे संतापलेल्या अजीमने भांडण थांबविण्याची विनंती दाम्पत्याला केली. यावेळी पत्नी झकिरा हिने विनंती करावयास आलेल्या अजीमला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या अजीमने झकिरा आणि तिच्या पतीवर चाकूने वार केला. अनपेक्षितपणे झालेला हा हल्ला पाहून घरात झकिराचा भाऊ मोहम्मद अजीज आपल्या बहिणीस वाचविण्यास गेला. त्यावर अजीम याने त्याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली झकिरा आणि तिचा भाऊ मोहम्मद मृत्युमुखी पडले तर झकिराचा नवरा जखमी झाला आहे. जखमींवर ठाण्यातील सरकारी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2012 4:45 am

Web Title: neighbour murdered brother sister
Next Stories
1 गुरुवारपासून माटुंगा येथे ‘लेखिका संमेलन’
2 ‘म्हाडा’च्या मीरा-रोड येथील घरांच्या सोडतीत ४० टक्के अर्जदार अपात्र
3 उपनगरी गाडय़ांचा रंग गडद होणार!
Just Now!
X