राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेदरलॅंडची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपलब्ध करणे, नसíगक आपत्तीशी मुकाबला करणे, हरीत गृहे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहकार्य करण्यासाठी नेदरलँडची मदत घेतली जाणार असून त्याबाबतचा  द्विपक्षीय करार महाराष्ट्र आणि नेदरल्ँाड यांच्यात शनिवारी होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी येथे दिली.
राज्याच्या दुष्काळग्रस्त भागात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यासाठी विकसित तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे या दृष्टीने हा करार केला जाणार आहे.